‘कपाट’प्रश्नी पर्यायासाठी अभ्यासगट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2016 23:49 IST2016-09-16T23:49:20+5:302016-09-16T23:49:32+5:30

आयुक्तांचा पुढाकार : नामवंत सल्लागारांचा समावेश

Study group for 'kapat' questionnaire option | ‘कपाट’प्रश्नी पर्यायासाठी अभ्यासगट

‘कपाट’प्रश्नी पर्यायासाठी अभ्यासगट

 नाशिक : गेल्या दीड-दोन वर्षांपासून भिजत पडलेल्या बांधकामातील ‘कपाट’प्रकरणी पर्याय शोधण्यासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद यांच्यासह नामवंत सल्लागारांचा एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.
इमारत बांधकामातील ‘कपाट’ प्रकरण गेल्या दीड-दोन वर्षांपासून गाजते आहे. तत्कालीन नगररचना सहायक संचालक विजय शेंडे आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी ‘कपाट’प्रकरणी ताठर भूमिका घेत बांधकामांना पूर्णत्वाचे दाखले देणे थांबविले होते. त्यावरून बांधकाम व्यावसायिकांसह वास्तुविशारद यांच्यात कमालीचा असंतोष पसरलेला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी ‘कपाट’ प्रकरण निकाली काढल्याचे जाहीर केले होते परंतु त्याबाबत अधिकृत आदेश प्राप्त न झाल्याने प्रकरण ‘जैसे थे’ आहे. त्यातच बांधकाम व्यावसायिकांना नवीन शहर विकास आराखड्याची प्रतीक्षा असून, त्यात तरी ‘कपाट’चा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, गेडाम यांची बदली झाल्यानंतर आयुक्तपदाची धुरा सांभाळणारे अभिषेक कृष्ण यांनी पहिल्याच दिवशी ‘कपाट’ प्रकरणी पर्याय शोधण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, आयुक्त कृष्ण यांनी कपाटप्रश्नी निर्माण झालेल्या प्रश्नावर पर्याय शोधण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला असून त्यात शहरातील क्रेडाई, आर्किटेक्ट व बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह नामवंत सल्लागारांचा समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Study group for 'kapat' questionnaire option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.