विद्यार्थ्यांनी निभावली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST2017-08-06T00:06:46+5:302017-08-06T00:09:22+5:30

एस.जी. प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. रक्षाबंधनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या निराधार मुलांच्या ‘आधारतीर्थ’ आश्रमात जाऊन राख्या बांधल्या. तसेच शाळेत विद्यार्थ्यांनीच जमा केलेला निधीही सुपूर्द करून निराधार भावांना आधार देण्याचे कार्य केले.

Student's Social Social Responsibility | विद्यार्थ्यांनी निभावली सामाजिक बांधिलकी

विद्यार्थ्यांनी निभावली सामाजिक बांधिलकी

सिन्नर : एस.जी. प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. रक्षाबंधनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या निराधार मुलांच्या ‘आधारतीर्थ’ आश्रमात जाऊन राख्या बांधल्या. तसेच शाळेत विद्यार्थ्यांनीच जमा केलेला निधीही सुपूर्द करून निराधार भावांना आधार देण्याचे कार्य केले.
संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांना बालपणातच सामाजिक बांधिलकी जपण्याचे धडे मिळाले. मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरीचे वर्गशिक्षक बापू चतुर, जीजा ताडगे, वृषाली जाधव, पद्मा गडाख यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. आधारतीर्थ येथे पार पडलेल्या कार्यक्रमास सचिव राजेश गडाख, सामाजिक कार्यकर्ते अमित माहेश्वरी, महिपत बोडके, कैलास कोडिंबे, शंकर चव्हाण, तातू चव्हाण, आश्रमाचे व्यवस्थापक प्रतीक धिंदळे, शीतल पवार, मुख्याध्यापक उदय कुदळे, विनायक काकुळते आदी उपस्थित होते. यावेळी आधारश्रमाला ३ हजार ४५१ रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. बालवाडी ते दहावीपर्यंत शिकणाºया १४० विद्यार्थ्यांना राख्या बांधून व त्यांच्यासोबत बसून अल्पोपहार केल्याने त्यांच्या दु:खी चेहºयावर आनंदाची हलकी लकेर या चिमुकल्यांनी आणली. तेव्हा छोटीशी वस्तू लाखमोलाची ही अनमोल भेट विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप काही शिकवण देणारी ठरणार आहे. यावेळी मंदा नागरे, कविता शिंदे, पद्मा गडाख, जीजा ताडगे यांनीही औक्षण करून राख्या बांधल्या. विनायक काकुळते यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक कुदळे यांनी आभार मानले. उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कुदळे, विनायक काकुळते, बापू चतुर, पांडुरंग लोहकरे, भास्कर गुरुळे, सागर भालेराव, जीजा ताडगे, जयश्री सोनजे, वृषाली जाधव, सतिष बनसोडे, अमोल पवार, सुधाकर कोकाटे, पद्मा गडाख, मंदा नागरे, कविता शिंदे, गणेश सुके, प्रमोद महाजन, संदीप गडाख, शिवाजी कांदळकर यांनी प्रयत्न केले.

Web Title: Student's Social Social Responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.