शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

स्थानिक समस्या निराकरणासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रयत्न करावे _ डॉ. रमण गंगाखेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 16:26 IST

विद्यार्थ्यांनी कोविड परिस्थितीचे अवलोकन करुन स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न करावेत. तसेच विद्यापीठाने संशोधनासाठी विविध अभ्यासक्रम व उपक्रम घ्यावेत त्याचा भविष्यात समाजाला मोठया प्रमाणात उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन डॉ.राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठ वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी कोविडचे अवलोकन करण्याचा सल्ला

नाशिक : विद्यार्थ्यांनी कोविड परिस्थितीचे अवलोकन करुन स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न करावेत. तसेच विद्यापीठाने संशोधनासाठी विविध अभ्यासक्रम व उपक्रम घ्यावेत त्याचा भविष्यात समाजाला मोठया प्रमाणात उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन डॉ.राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा वर्धापन दिन प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र संचालक संदीप कुलकर्णी, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य आदी उपस्थित होते. डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, समाजपयोगी संशोधनासाठी उर्मी व इच्छाशक्ती महत्वाची असून कोणत्याही क्षेत्रात प्रगती करावयाची असेल तर संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण घेतांना मुलांना वैचारिक स्वातंत्र्य देण्याची ‌आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची सामाजिक व शैक्षणिक इच्छाशक्ती प्रबळ होईल. विद्यापीठाने शिक्षक व विद्यार्थ्यांकरीता जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्यास प्रगतीला नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केेले.तर विद्यापीठ आवारात नव्याने सुरु होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा उपयोग समाजाला होणार असून आरोग्य क्षेत्रात संशोधन व कार्य करण्यासाठी मोठया प्रमाणात संधी आहेत , त्याचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उपयोग करून घेण्याचा तसेच विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या कार्यशाळा व उपक्रमात सहभाग घेऊन व्यापक संशोधन करण्याचे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी केले आहे.  दरम्यान, पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्व संलग्नित महाविद्यालयात वृक्षारोपण करण्याचे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले. तसेच विद्यापीठ आवारात डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHealthआरोग्यuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी