शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

विद्यार्थ्यांनी प्रयोगशील असावे- प्रसाद कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 4:57 PM

विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविज्ञान दिनानिमित्त रुंगटा शाळेत प्रदर्शनविद्यार्थ्यांना प्रयोगशील बनण्याचे मार्गदर्शन

नाशिक :विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२८) वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक डी. डी. आहिरे, संस्थेचे माजी सचिव अरुण पैठणकर, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्रावण सूर्यवंशी, नीलिमा कांगणे उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरामध्ये विज्ञान असून, विज्ञान शिकताना प्रयोगशील असले पाहिजे. एखाद्या प्रयोगात अपयश आले तरी त्यात सातत्य ठेवावे. त्यातूनच यशाचा मार्ग निघेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विज्ञार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांमधील ज्वालामुखीच्या प्रतिकृतीतून रसायनांच्या सहाय्याने ज्योत पेटवून ज्वाला व धूर यांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. विज्ञान दिनाविषयी सचिन कुलकर्णी यांनी माहिती दिली. दरम्यान, आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘शास्त्रज्ञांचा जीवन परिचय’ या हस्तलिखिताचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. त्यांना विज्ञान शिक्षक श्रावण सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले होते. प्रदर्शनातील प्रकल्पातून आदित्य पगारे याने प्रथम क्रमांक, तर मिथिलेश राठोड याने द्वितीय क्रमांक पटकावला. सूत्रसंचालन उमा लोकरे यांनी केले, तर आभार दीपक गायकवाड यांनी मानले.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीscienceविज्ञान