अभिनय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:53 IST2019-04-28T23:52:59+5:302019-04-28T23:53:29+5:30

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड संकुलातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित अभिनय कार्यशाळेचा समारोप उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख म्हणून माजी विद्यार्थी निषाद वाघ, शालेय समिती अध्यक्षा सुषमा भानगावकर, नाट्य अभिनय कार्यशाळेचे प्रमुख हेमंत देशपांडे, कार्यशाळा प्रमुख कामिनी पवार, प्राचार्य प्र. ला. ठोके, नाट्य कार्यशाळचे प्रशिक्षक सुरेश गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते.

 Students respond to the acting workshop | अभिनय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

अभिनय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

नाशिकरोड : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड संकुलातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित अभिनय कार्यशाळेचा समारोप उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख म्हणून माजी विद्यार्थी निषाद वाघ, शालेय समिती अध्यक्षा सुषमा भानगावकर, नाट्य अभिनय कार्यशाळेचे प्रमुख हेमंत देशपांडे, कार्यशाळा प्रमुख कामिनी पवार, प्राचार्य प्र. ला. ठोके, नाट्य कार्यशाळचे प्रशिक्षक सुरेश गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिनय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी जाई उदावंत, राधिका तसेच शिवानी व तिच्या संघाने मूक अभिनय सादर केला. अकरा दिवसांच्या अभिनय कार्यशाळेसाठी वृषाली भट, रूपाली झोडगेकर, सुमेधा गोडबोले, पूनम पानसरे, मनस्वी सोनवणे, सोनाली लिलके, संदीप पगारे आदींनी सहकार्य केले.

Web Title:  Students respond to the acting workshop

टॅग्स :Nashikनाशिक