विद्यार्थ्याकडून ‘लाख’मोलाची पर्स परत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:28 IST2019-12-23T15:28:32+5:302019-12-23T15:28:46+5:30
निफाड : तालुक्यातील शिवडी रेल्वे स्थानकावर सापडलेली एक लाख रूपये ऐवज असलेली पर्स परत करणाऱ्या निफाड येथील वैनतेय विद्यालयाचा विद्यार्थी यश दत्तू वाबळे याचा प्राचार्य डी.बी. वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्याकडून ‘लाख’मोलाची पर्स परत !
निफाड : तालुक्यातील शिवडी रेल्वे स्थानकावर सापडलेली एक लाख रूपये ऐवज असलेली पर्स परत करणाऱ्या निफाड येथील वैनतेय विद्यालयाचा विद्यार्थी यश दत्तू वाबळे याचा प्राचार्य डी.बी. वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यश हा शिवडी येथे राहतो. तो निफाड येथील वैनतेय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकतो. यश वाबळे याला शिवडी रेल्वे स्थानकावर २५ हजार रूपये रोख , एक मोबाईल, दीड तोळा सोन्याचे दागिने असा एक लाख रु पये किमतीचा ऐवज असलेली पर्स सापडली होती. या पर्स मधील मोबाईलवर यशचे वडील दत्तू वाबळे यांनी बदलापूर येथील ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर पाटील कुटुंब शिवडीला आले व दत्तू वाबळे यांनी हा ऐवज बदलापूर येथील ज्ञानेश्वर पाटील आणि ज्योती पाटील यांना परत केला होता. यशच्या प्रामाणकिपणाबद्दल त्याचा वैनतेय विद्यालयात प्राचार्य डी. बी. वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक रविकांत कर्वे पर्यवेक्षक एस. एम. सोनवणे सर संतोष गोरवे , बी.आर. सोनवणे , बा. बा गुंजाळ , गणेश कुयटे , श्रीमती मनीषा गुजराथी , डी. एस ढिकले आदी उपस्थित होते.