शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST2020-12-11T04:40:56+5:302020-12-11T04:40:56+5:30
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकट कोसळल्याने अनेक पालकांना फी भरणे शक्य नसले तरी अनेक पालक सक्षम असूनदेखील शुल्क भरण्यास ...

शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकट कोसळल्याने अनेक पालकांना फी भरणे शक्य नसले तरी अनेक पालक सक्षम असूनदेखील शुल्क भरण्यास टाळाटळ करीत आहेत; मात्र शाळा चालवण्यातदेखील आता अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
गेली आठ महिने शाळा व्यवस्थापनाने पालकांकडे शाळेच्या फीसाठी तगादा लावला नाही. केवळ विनंतीचा सूर ठेवला. यासाठीच अनेक शाळांनी फीमध्ये सवलतही दिली. फी भरली नाही तरीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले; परंतु ५० टक्क्यांहून अधिक पालकांनी फी न भरल्याने शाळा आर्थिक संकटात सापडल्या आहेत. खासगी शाळा विनाअनुदानित असल्याने पालकांच्या फीवरच त्या चालतात. शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणेही आता कठीण बनल्याने फी न भरणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण उपसंचालकांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कुठल्याही विद्यार्थ्यास शाळेतून काढले जात नसून, केवळ ऑनलाईन शिक्षणाची लिंक बंद केली जात आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नाशिक स्कूल असोसिएशनच्या अध्यक्षा हिमगौरी आहेर आडके, माजी अध्यक्ष रतन लथ, सचिव सचिन जोशी, सिध्दार्थ राजगृह, मनीष अग्रवाल, रितू अग्रवाल, ॲड. शुक्ल, विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्यासह अन्य शाळांचे प्रतिनिधी निवेदन देताना उपस्थित होते.
-----------
छायाचित्र आर फोटोवर ०९ शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद करण्याच्या निर्णयाचे निवेदन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना देताना नाशिक स्कूल असोसिएशनच्या अध्यक्षा हिमगौरी आहेर आडके, समवेत रतन लथ, सचिन जोशी, सिध्दार्थ राजगृह, मनीष अग्रवाल, रितू अग्रवाल, ॲड. शुक्ल, विजयालक्ष्मी मणेरीकर आदी.