जेईई प्रथम परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:13 IST2019-01-20T01:11:38+5:302019-01-20T01:13:09+5:30
देशभरात ६ जानेवारीपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन २०१९ प्रथम परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. १९) जाहीर झाला आहे. देशभरातून ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे.

जेईई प्रथम परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश
नाशिक : देशभरात ६ जानेवारीपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन २०१९ प्रथम परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. १९) जाहीर झाला आहे. देशभरातून ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे.
जेईई परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असून, या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यांहून अधिक गुण संपादित करीत यश मिळविले आहे. दरम्यान, या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एनटीए.एसी.इन या संकेतस्थळावर बघता येणार आहे.
यांनी मिळविले यश
धु्रव धिंग्रा (९९.९६ टक्के), श्रवण नावंदर (९९.९४ टक्के), जय सोनवणे (९९.८९ टक्के), ऋषिकेश मेटकर (९९.८९ टक्के), दिव्याश्री तांबडे (९९.८० टक्के), इशान गुजराती (९९.७० टक्के), सिद्धी बागुल (९९.६३ टक्के), राज गोरे (९९.५७ टक्के), यश चौधरी, लोकेश घुले, व्यंकटेश कुलकर्णी, राहुल दळकरी, यश पाटील, श्रृती निसाळ, अनमोल रेदासानी, उत्कर्ष ठाकरे, तेजस पगारे, हिमांशू वाकोडे, सुबोध पाटील, तन्मय नंदन या विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत यश मिळवले आहे.