शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

एमबीएचे प्रवेश रखडल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:29 IST

राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, या याचिकेवर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेशप्रक्रियेला स्थगिती असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, राज्यभरातील एमबीए प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. यावर्षी तंत्रशिक्षण प्रवेशप्रक्रियेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू असून, या गोंधळास सरकारचे शैक्षणिक क्षेत्रातील धरसोडीचे धोरण जबाबदार असल्याची प्रतक्रिया टीका शैक्षणिक क्षेत्रातून उमटत आहे. 

नाशिक: राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, या याचिकेवर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेशप्रक्रियेला स्थगिती असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, राज्यभरातील एमबीए प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. यावर्षी तंत्रशिक्षण प्रवेशप्रक्रियेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू असून, या गोंधळास सरकारचे शैक्षणिक क्षेत्रातील धरसोडीचे धोरण जबाबदार असल्याची प्रतक्रिया टीका शैक्षणिक क्षेत्रातून उमटत आहे. राज्यातील तंत्र व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रि या राबविण्यात ‘सार’ प्रणाली अपयशी ठरल्याने सरकारने विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया राबविण्याची जबाबदारी महासीईटी व तंत्रशिक्षण संचालनालयावर सोपविली होती. त्यानंतर एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपावर मुंबईतील स्वायत्त झालेल्या महाविद्यालयांनी जागावाटपात महासीईटीने स्वायत्त दर्जा ग्राह्य धरला नसल्याचे निदर्शनास आणून देत मुंबई उच्च न्यायालयात प्रवेशप्रक्रियेला आव्हान दिल्याने न्यायालयाने नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे पहिल्या फेरीत झालेले प्रवेशही रद्द करण्यात आले. पहिल्या फेरीतील प्रवेश रद्द झाल्यामुळे सीईटी सेलतर्फे  पुन्हा नव्याने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे एमबीएच्या प्रवेशप्रक्रियेला अतिविलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या एमबीए प्रवेशप्रक्रियेमुळे एमबीएच्या प्रथम सत्रातील परीक्षा आणि प्रथम वर्षातील इंटर्नशीपही लांबण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संधी गमविण्याची भीती निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी