शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ‘पोस्ट बॅँकिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:43 IST

वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या बीवायके महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देअभ्यास दौरा : पत्रपेटी ते एटीएमपर्यंतचा प्रवास बघून थक्क

नाशिक : वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या बीवायके महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.वाणिज्य शाखा म्हटली की बॅँकिंग क्षेत्र आलेच. दिवसेंदिवस बॅँकिंगमध्ये घडून येणारे आमूलाग्र बदल आणि त्याच दृष्टिकोनातून टपाल खात्यानेदेखील टाकलेली कात लक्षात घेता बीवायकेच्या सुमारे दहा ते बारा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परवानगीने टपाल कार्यालयाला भेट दिली. यावेळी वरिष्ठ पोस्ट मास्तर मोहन अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना टपाल विभागाच्या बॅँकिंगप्रणालीसह आर्थिक व्यवहाराबाबतच्या टपालाच्या विविध योजनांची माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजना, इंडियन पोस्ट पेमेंट बॅँक, भविष्यनिवार्हनिधी खाते योजना, बचत किसान पत्र, पोस्टल विमा, मुदत ठेव या आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित चालणाºया कार्याचाी सविस्तर माहिती दिली. तसेच आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खात्याचा कामाचा ताण निम्म्यापेक्षा अधिक कमी झाल्याचा गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.पत्रपेटीपासून सुरू झालेला टपाल खात्याचा प्रवास थेट एटीएमपर्यंत येऊन पोहचल्याचे बघून विद्यार्थ्यांनाही आनंद झाला. सर्वांत सुरक्षित असे सरकारी नियंत्रण असलेले जुने खाते म्हणून पोस्टाची ओळख विद्यार्थ्यांना पटली. अहिरराव यांनी पोस्टाचे विविध अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपसंदर्भातही विद्यार्थ्यांना माहिती दिली. बीवायके महाविद्यालयाकडून हा अभ्यास दौरा पदवीच्या अखेरच्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांकरिता प्रत्यक्ष अभ्यास अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.‘याची देही याची डोळा’ अनुभवटपाल बटवडा विभाग, स्पीड पोस्ट विभाग, फ्रॅन्किंग विभागाला भेटी देत विद्यार्थ्यांनी येथील प्रत्यक्ष कार्यानुभव ‘याची देही याची डोळा’ बघितले. तसेच पोस्टखाते काळानुरूप आधुनिक झाले असल्याचा प्रत्ययदेखील विद्यार्थ्यांना आला. येथील पत्रपेटी, टपाल डिलिव्हरी व्हॅन आणि एटीएमबघून विद्यार्थी अवाक् झाले.

टॅग्स :NashikनाशिकPost Officeपोस्ट ऑफिसStudentविद्यार्थी