विजेच्या धक्क्याने विद्यार्थी ठार
By Admin | Updated: October 24, 2016 23:13 IST2016-10-24T23:13:02+5:302016-10-24T23:13:34+5:30
पिंपळदर : पंप सुरू करताना घटली दुर्घटना

विजेच्या धक्क्याने विद्यार्थी ठार
सटाणा : पिकाला पाणी देण्यासाठी वीजपंप सुरू करताना विजेचा तीव्र धक्का बसून युवक ठार झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील पिंपळदर येथे सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
पिंपळदर येथील विकी बापू मोहाटकर (१८) हा युवक भावासोबत पिकांना पाणी देण्यासाठी सोमवारी सकाळी शेतात गेला होता. थोरला भाऊ प्रात:विधीसाठी गेल्याने विकी विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेला. मात्र अशातच त्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि जागेवरच कोसळला. थोरला भाऊ घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. मात्र तोपर्यंत विकीची प्राणज्योत मालविली होती. त्याचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणून दुपारी शोकाकुल वातावरणात पिंपळदर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विकी मोहाटकर हा सटाणा महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. (वार्ताहर)