विद्यार्थी सेनेचे ‘फडणवीस वॉटरपार्क’ आंदोलन
By Admin | Updated: July 15, 2017 00:35 IST2017-07-15T00:35:09+5:302017-07-15T00:35:22+5:30
सातपूर : पावसामुळे सातपूर येथील मनपाच्या विभागीय कार्यालयासमोर साचलेल्या पावसाच्या पाण्याला ‘फडणवीस वॉटरपार्क’ची उपमा देत सातपूर विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले

विद्यार्थी सेनेचे ‘फडणवीस वॉटरपार्क’ आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सातपूर येथील मनपाच्या विभागीय कार्यालयासमोर साचलेल्या पावसाच्या पाण्याला ‘फडणवीस वॉटरपार्क’ची उपमा देत सातपूर विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पावसाचे तळे साचले होते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होती. यास महापालिकेला जबाबदार धरीत सातपूर शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ क्षीरसागर, संदीप गायकर, देवा जाधव, अमोल सूर्यवंशी, वैभव ढिकले, किशोर निकम, प्रमोद जाधव, मंगेश पवार, आकाश मोराडे, स्वप्नील पासले, स्वप्नील घोडके, ललित वाघ, नंदेश ढोले, धनंजय तांदळे आदींसह शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भाजपा व मनपा प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.