चिंचला आश्रमशाळेतील विद्यार्थी राज्य पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:24 IST2019-12-24T00:22:32+5:302019-12-24T00:24:00+5:30
कोकमठाण येथे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील चिंचला येथील आश्रमशाळेतील सोळा खेळाडूंची राज्य पातळीवर निवड झाली.

राज्य पातळीवर निवड झालेल्या चिंचला आश्रमशाळेतील सोळा विद्यार्थ्यांसमवेत दिलीप खांडवी, गंगाराम गावित, योगेश गावित, रामदास गवळी, दिनकर महाले, आर. बी. राठोड आदी.
सुरगाणा : कोकमठाण येथे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील चिंचला येथील आश्रमशाळेतील सोळा खेळाडूंची राज्य पातळीवर निवड झाली.
कोकमठाण येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांघिक व मैदानी स्पर्धा नुकत्याच पार पडली. यामध्ये कळवण प्रकल्पाचे नेतृत्व करताना १७ वर्षातील मुलांच्या गटात कबड्डी प्रकारात धुळे प्रकल्पाचा पराभव केला. रिलेमध्ये १७ वर्ष आतील मुलींचा प्रकारात यावल, खो-खोमध्ये १७ वर्ष आतील मुलींचा नंदुरबार प्रकल्पाचा पराभव करत राज्य पातळी गाठली. योगेश कनोजे, मनोज वाघमारे, सचिन कामडी, सचिन पाडवी, संजय चौधरी, गणेश गवळी, योगेश गवळी, किरण भोये, पांडुरंग पवार, कांतिलाल गावित, जयश्री जाधव, अश्विनी कुवर, पूजा महाले, दीपाली गावित, ज्योती वाघमारे, रेणुका गावित, रिंकू चव्हाण या खेळाडूंची राज्य पातळीवर निवड झाली. राज्यस्तरिय क्रीडा स्पर्धा अमरावती येथे होणार आहेत. संघाला क्रीडाशिक्षक दिलीप खांडवी,
गंगाराम गावित, योगेश गावित, रामदास गवळी, दिनकर महाले, वर्षा तांबे, सर्व शिक्षक - शिक्षकेतर वर्गाचे मार्गदर्शन मिळाले.