आधार कार्डकरिता विद्यार्थ्यांची तारांबळ

By Admin | Updated: July 19, 2015 00:14 IST2015-07-19T00:14:54+5:302015-07-19T00:14:54+5:30

पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड काढणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश शासनाने काढलेला आहे.

Student's card for Aadhar card | आधार कार्डकरिता विद्यार्थ्यांची तारांबळ

आधार कार्डकरिता विद्यार्थ्यांची तारांबळ

नाशिक - जगभरातील तरुणाईला चॅटिंगचे वेड लावणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने आता साधू-महंतांनाही भुरळ घातली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये दाखल झालेले साधू-महंत परस्परांशी संवाद साधण्यासाठी चक्क ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या मेसेंजर सेवेचा वापर करत आहेत. विविध ग्रुपच्या माध्यमातून ही मंडळी फावल्या वेळेत व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर चॅटिंग करीत संदेशांची देवाण-घेवाण करतात. अर्थात हे सर्व संदेश धार्मिक असल्याने या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात शिष्यांचा गोतावळादेखील आहे. बहुतांश साधू-महंत आपला शिष्य संप्रदाय निर्माण करण्यासाठी फेसबुकचाही वापर करत आहेत. या माध्यमातून त्यांनी देश-परदेशांत आपल्या शिष्यांचा मोठा गोतावळा निर्माण केलेला दिसून येतो. तर बरेच साधू ट्विटरवरदेखील अ‍ॅक्टिव्ह आहेत. रोजच्या ट्विट्सच्या माध्यमातून ते आपल्या शिष्यांना उपदेश करतात. ई-संवादाची ही आधुनिक माध्यमे सध्या सर्वच आखाड्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहेत. भारतातच नव्हे, तर जगभरातील शिष्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या साधू-महंतांमध्ये अ‍ॅड्राईड मोबाइलचे कमालीचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे बहुतांश साधूंच्या झोळीत चंदन, अष्टगंध, बुक्का, हळदी-कुंक या पूजेच्या साहित्यांबरोबरच अ‍ॅड्राईड मोबाइल हमखास बघावयास मिळतो. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर जगभरातील शिष्यांनी पाठविलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न विसरता साधू-महंतांकडून दिली जातात. याबाबत बोलताना महंत रामसनेहीदास यांनी सांगितले की, व्हॉट्स अ‍ॅप किंवा फेसबुकचा वापर करण्यात काहीच गैर नाही. सध्या आधुनिक माध्यमांनी क्रांती घडवून आणली आहे; त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. या माध्यमांमुळे आपला वेळ तर वाचतोच, तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा एक वेगळा आनंदही मिळतो.
महंतांचा व्हॉट्स अ‍ॅपवरही वाद
कधी मानापमान तर कधी जागेच्या मुद्द्यांवर नेहमीच खटके उडत असलेल्या महंतांचे व्हॉट्स अ‍ॅपवर असलेल्या ‘महंत’ या ग्रुपमध्येदेखील वाद होत असल्याचे एका महंताने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दर दिवसाला वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या ग्रुपवर शेअर केल्या जातात. त्यामुळे त्यावर लगेचच प्रतिक्रिया दिल्या जात असून, त्यातून बऱ्याचदा वाद निर्माण होतो. या ग्रुपमध्ये जवळपास सर्वच आखाड्यांचे महंत असल्याने कधी कधी वाद जास्तच विकोपाला जात असल्याचेही सांगितले.

Web Title: Student's card for Aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.