अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 22:44 IST2018-12-10T22:42:46+5:302018-12-10T22:44:03+5:30

सिडको : परिसरातील शुभम पार्कमध्ये राहणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (१८) याने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एफवायबीकॉम परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून पुढील तपास केला जात आहे.

Student suicides due to failure | अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

विक्रांत चंद्रभान काळे

ठळक मुद्देरूग्णालयात नेण्यापूर्वीच विक्रांतचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सिडको : परिसरातील शुभम पार्कमध्ये राहणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (१८) याने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एफवायबीकॉम परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून पुढील तपास केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास विक्रांतने राहत्या घरातील छताच्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ खोलीचा दरवाजा तोडून विक्रांतला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. रूग्णालयात नेण्यापूर्वीच विक्रांतचा दुर्दैवी मृत्यू झाला. विक्र ांतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने त्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मित्रपरिवाराने केली आहे.

Web Title: Student suicides due to failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.