विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:36 IST2018-02-18T23:32:32+5:302018-02-18T23:36:05+5:30
नाशिक : बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरातील वैभव कॉलनीत शुक्रवारी (दि़ १६) रात्रीच्या सुमारास घडली़

विद्यार्थिनीची आत्महत्या
ठळक मुद्दे फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्याआत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
नाशिक : बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरातील वैभव कॉलनीत शुक्रवारी (दि़ १६) रात्रीच्या सुमारास घडली़ साक्षी दिलीप कुलकर्णी (१७, रा. फ्लॅट नंबर ४, अमित अपार्टमेंट, वैभव कॉलनी, स्प्लेंडर हॉलच्या मागे, इंदिरानगर) असे आत्महत्या करणाºया विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास साक्षीने हॉलमधील फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.