शाळेचे प्रवेशद्वार तुटल्याने विद्यार्थी जखमी

By Admin | Updated: December 5, 2014 00:04 IST2014-12-05T00:03:20+5:302014-12-05T00:04:13+5:30

शाळेचे प्रवेशद्वार तुटल्याने विद्यार्थी जखमी

Student collapses due to collapse of school entrance | शाळेचे प्रवेशद्वार तुटल्याने विद्यार्थी जखमी

शाळेचे प्रवेशद्वार तुटल्याने विद्यार्थी जखमी

पिंपळगाव बसवंत : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १,२,३चे प्रवेशद्वार तुटल्याने विद्यार्थी जखमी झाला आहे. पिंपळगाव बसवंतच्या प्राथमिक शाळेचे लोखंडी प्रवेशद्वार जुने झाल्याने बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक तुटल्याने आकाश देवरे हा ९ वर्षाचा विद्यार्थी जखमी झाला. अन्य मुले मात्र गेट तुटल्याने थोडक्यात वाचले असून, शाळेचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार हे अनेक वर्षाचे झाल्याने ते अचानक तुटले गेले. शाळेचे प्रवेशद्वारासमोर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते विद्याथी सुटल्यावर या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या कोंडी झाला.

Web Title: Student collapses due to collapse of school entrance