शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

जनसंघर्षाचा लढा सुरूच राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:23 IST

नाशिक : सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. जनसंघर्ष यात्रेदरम्यान जनताच काँग्रेसचे सरकार आले पाहिजे, अशी भावना व्यक्त करीत आहे. महाराष्टÑाच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी कॉँग्रेसने जनसंघर्ष यात्रेतून परिवर्तनाची मशाल पेटवली आहे. नाकर्त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा घणाघात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे जिल्ह्यात आगमन

नाशिक : सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. जनसंघर्ष यात्रेदरम्यान जनताच काँग्रेसचे सरकार आले पाहिजे, अशी भावना व्यक्त करीत आहे. महाराष्टÑाच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी कॉँग्रेसने जनसंघर्ष यात्रेतून परिवर्तनाची मशाल पेटवली आहे. नाकर्त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा घणाघात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यानिमित्त गोदाकाठी आयोजित जाहीर सभेत खासदार चव्हाण बोलत होते. दुसºया टप्प्यातील या यात्रेचे जिल्ह्णात आगमन झाले.  रविवारी मालेगाव, सटाणा, चांदवड येथे सभा आटोपून सायंकाळी नाशकात यात्रा पोहोचली. खासदार चव्हाण पुढे म्हणाले, कॉँग्रेस ज्यावेळी विरोधी पक्षात होती, त्यावेळी सरकारच्या देशहिताच्या निर्णयाला पाठिंबा दिला, परंतु ज्या ज्या वेळी सरकार स्वत:चे खिसे भरायला लागले त्यावेळी कॉँगे्रसने विरोधही केला आहे. त्यामुळे सध्याचे सरकार भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशामुळे मस्तवाल झाले आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच ध्येय ठरवून सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारला शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, सर्वसामान्य गरीब जनतेच्या प्रश्नांचे काही देणे-घेणे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.नाशिक दौºयावर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन सातशे कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याच्या घोेषणेचा खासदार चव्हाण यांनी उल्लेख केला. मेट्रो, स्मार्ट सिटीसाठी विविध घोषणा करून आगामी निवडणुकीसाठी मतदानाची तयारी फडणवीस यांनी केली असली तरी, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करणाºया फडणवीस यांनी एक रुपयाही फेकून मारला नाही, त्यामुळे अगोदर त्यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे व मगच नाशिकच्या विकासाच्या बाता माराव्यात, असे आवाहन करून शेतकरी कर्जमाफीचे पैसे शेतकºयांपर्यंत पोहोचले नाहीत व कोट्यवधीच्या घोषणा कशा करतात, असा सवालही त्यांनी केला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राफेलचा भ्रष्टाचार व त्यात नरेंद्र मोदींचा सहभाग याच मुद्द्यावर लढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. राफेलप्रश्नी सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यावर सोपवण्यात आली असून, त्यांनी गोदातीरी यावे व आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे खुले आव्हान चव्हाण यांनी दिले. देशातील आर्थिक व्यवसाय अतिशय बिकट झाली असून, ३५ लाख कोटी रुपये इंधन दरवाढीतून सरकारने तुमच्या आमच्या खिशातून कमाविले तर दुसरीकडे उद्योगपतींना कर्ज माफ केले, असा आरोपही त्यांनी केला. सर्व पातळीवर सरकार अपयशी ठरल्याने येणाºया निवडणुकीत मोदींना घरी बसविण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, देशातील सरकारने शेतकरी, व्यापाराची फसवणूक केली असून, शेतकरी देशोधडीला लागल्याने व्यापारी अडचणीत सापडले आहेत. शेतकरी कर्जमाफी म्हणजे राजा उदार, हाती भोपळा दिला अशी असून, संपूर्ण देश सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याने तुमच्यातील नाराजी व असंतोषाला वाट करून देण्याची वेळ निवडणुकीच्या निमित्ताने उभी ठाकली असून, त्याचा पुरेपूर फायदा घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रवक्ते सचिन सावंत, राजू वाघमारे, गणेश उन्हवणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शरद अहेर यांनी केले. सभेस आमदार डॉ. सुधीर तांबे, निर्मला गावित, माजी मंत्री शोभा बच्छाव, विनायकदादा पाटील, जयप्रकाश छाजेड, राजाराम पानगव्हाणे, तुषार शेवाळे, प्रताप वाघ, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, सुरेश मारू, शाहू खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.भामरेंना राफेल नव्हे ‘रायफल’ कळतेआपल्या भाषणात खासदार चव्हाण यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यावर टीका केली. राफेलप्रश्नी त्यांना काहीही माहीत नाही असे सांगून, भामरे यांना राफेल नव्हे तर ‘रायफल’ कळते. दोन-चार तहसीलदार, दोन-तीन प्रांत अधिकारी, चार-दोन पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांमध्येच त्यांना रस असून, देशाच्या प्रश्नावर त्यांचे ज्ञान जेमतेम असल्याचे सांगितले.चव्हाण यांना आरोग्यप्रश्नी चिंताप्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नाशिक शहराच्या ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असून, डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातलेले असताना निव्वळ विकासाच्या घोषणा करणाºया सरकारने शहराची वाट लावल्याचा आरोप केला. जिवंत माणसे वाचवा, असे आवाहन करून, भाजप सरकार बोलायला स्मार्ट परंतु कर्तृत्वावर शून्य असल्याची टीकाही त्यांनी केली. नाशिककरांना दत्तक नव्हे तर सावत्र म्हणूनच वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.