शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वाची झुंज : नाशकात प्रौढ बिबट्याने काढला लहान बिबट्याचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 15:56 IST

साधारणत: आठवडाभरापुर्वी या दोन्ही बिबट्यांमध्ये लढाई झाली असावी, असा अंदाज वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी वर्तविला आहे.

ठळक मुद्देपावासानेमुळे बिबट्याचा मृतदेह कुजलाआठवडाभरापुर्वी या दोन्ही बिबट्यांमध्ये लढाई

नाशिक : आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वन्यप्राण्यांमधील दोन्ही नर आपआपसांत निकराची झुंज देतात. या झुंजीत अनेकदा वन्यप्राण्यांचा मृत्यूही होतो, असाच प्रकार नाशिकमधील पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील तळेगाव येथील राखीव वनात काही दिवसांपुर्वी घडल्याचे कुजलेल्या अवस्थेत रविवारी (दि.१७) आढळून आलेल्या बिबट्याच्या मृतदेहावरून समोर आले.नाशिक तालुक्यातील महिरावणीजवळ असलेल्या तळेगाव शिवारातील राखीव वनासह येथील डोंगराच्या पायथ्याला बिबट, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर आढळतो. दरम्यान, आपले क्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी एक प्रौढ बिबट्या आणि नुकताच वयात आलेला बिबट्यामध्ये संघर्ष उफाळून आला. साधारणत: आठवडाभरापुर्वी या दोन्ही बिबट्यांमध्ये लढाई झाली असावी, असा अंदाज वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी वर्तविला आहे.दोन दिवसांपुर्वी शहरासह ग्रामिण भागात मोसमीपुर्व पावासाने जोरदार हजेरी लावल्यामुळे बिबट्याचा मृतदेह कुजला आणि वनक्षेत्रातून तळेगावातील लोकवस्तीपर्यंत हवेच्या सहाय्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने गावकऱ्यांनी वनाच्या दिशेने दुर्गंधीच्या अधारे माग काढला; मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही. गावकऱ्यांनी ही बाब वनधिकारी व कर्मचा-यांना कळविली. काही वेळेतच सातपूर परिमंडळचे वनपाल, वनरक्षकांना घेऊन भदाणे हे राखीव वनात पोहचले. दुर्गंधीच्या अधारे जंगलात शोध घेत असताना मातीआड झालेले बिबट्याची कातडी व डोके काहीसे दिसून आले. त्यामुळे वनरक्षकांनी तत्काळ फावड्याच्या सहाय्याने माती बाजूला केली असता बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. यावेळी कातडी पुर्णपणे मातीत गळून गेलेली होती तर हाडांचा सांगाडा आणि डोके यावरून त्याची ओळख वनकर्मचा-यांनी पटविली. दीड ते दोन वर्षांचा बिबट असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.बिबट्याचा मृत्यू हा अस्तित्वाच्या लढाईत झाला असल्याचा दावा नाशिक पश्चिम वनविभागाने केला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवleopardबिबट्याforest departmentवनविभागtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरAccidentअपघात