समस्या सोडविण्यासाठी मजबूत संघटन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:40 IST2019-07-25T00:40:08+5:302019-07-25T00:40:24+5:30
समाजातील रोजगार, शिक्षण आदी समस्या सोडवायच्या असतील तर संघटन आवश्यक आहे. माणसाला माणूस जोडणे गरजेचे असून, संघटनेतच विकासाची वाटचाल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामीजी यांनी केले.

समस्या सोडविण्यासाठी मजबूत संघटन गरजेचे
नाशिकरोड : समाजातील रोजगार, शिक्षण आदी समस्या सोडवायच्या असतील तर संघटन आवश्यक आहे. माणसाला माणूस जोडणे गरजेचे असून, संघटनेतच विकासाची वाटचाल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामीजी यांनी केले.
आर्टिलरी सेंटररोड येथील मोती मंगल कार्यालयात राष्टÑीय लिंगायत मोर्चातर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रबोधन शिबिरात बोलताना कोरणेश्वर स्वामीजी म्हणाले की, महिलांना सन्मानाची वागणूक गरजेची आहे. महात्मा बसवेश्वर यांनी ही समस्या ओळखून महिला सबलीकरण, समता यावर भर दिला होता, असे स्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वागताध्यक्ष संजय गवळी, अनंत दंदणे, संदीप झारेकर, सिध्दार्थ साठे, रमेश आवटे, किशन सूर्यवंशी, जगन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच लिंगायत महापुरुष महात्मा बसवेश्वर, मन्मत स्वामी, शिवयोगी सिद्धरामेश्वर, सिदाजी आप्पा, अक्का महादेवी यांच्या योगदानाबाबत माहिती देण्यात आली. राज्यस्तरीय प्रबोधन शिबिरात विविध ठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित होते.
विविध विषयांवर चर्चा
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते नाना नगरकर, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, संजय गवळी, जगन गवळी, राजेश गवळी, उन्हाळे गुरुजी, संदीप चौधरी, विजय गवळी, अनंत दंदणे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिबिराच्या पहिल्या सत्रात लिंगायत विचारधारा आणि लिंगायत एक ऐतिहासिक चळवळ यावर मनोगत व्यक्त करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात लिंगायत समाजातील दशा आणि दिशा यावर चर्चा करण्यात आली.