शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘दशक्रिया’ चित्रपटाला सकल ब्राह्मण समाजाकडून तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:16 AM

भावना दुखावणारे संवाद आणि चित्रीकरण असल्याचा आरोप करीत शहरातील ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रयोगाला सकल ब्राह्मण समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला. तथापि, विरोध मोडून पोलीस बंदोबस्तात ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ पार पडला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ब्राह्मण समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होत.

ठळक मुद्दे पोलीस बंदोबस्तात ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ विविध ब्राह्मण समाज संघटनांनी निदर्शने केली जोरदार घोषणाबाजी

नाशिक : भावना दुखावणारे संवाद आणि चित्रीकरण असल्याचा आरोप करीत शहरातील ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या प्रयोगाला सकल ब्राह्मण समाजाकडून कडाडून विरोध करण्यात आला. तथापि, विरोध मोडून पोलीस बंदोबस्तात ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ पार पडला.या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ब्राह्मण समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होत. परंतु त्यानंतरही शुक्रवारी सिनेमॅक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. दुपारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विविध ब्राह्मण समाज संघटनांनी निदर्शने केली आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची मागणी केली. ‘दशक्रिया’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद वगळण्याची मागणी करत यावेळी विरोध दर्शविण्यात आला.  यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. जातीय तेढ निर्माण करणारा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, याबाबत शासन स्तरावरून कुठलीही सूचना प्राप्त न झाल्याने चित्रपट पूर्व नियोजनाप्रमाणेच प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटगृहातर्फे दिली. सिटी सेंटर मॉल सिनेमॅक्स चित्रपटगृहात दुपारी २.३० वाजता या चित्रपटाचा एकमेव शो ठेवण्यात आला आहे.  या आंदोलनात पुरोहित संघांचे अध्यक्ष सतीश शुक्ल, बहुभाषिक ब्राह्मण महासंघांचे अध्यक्ष अ‍ॅड. भानुुदास शौचे, तसेच चंद्रशेखर पुरोहित, हेमंत तलाजिया, तुषार जोशी, माधवराव भणगे, श्रीकृष्ण बुवा सिन्नरकर महाराज, वैभव दीक्षित, अवधुत कुलकर्णी, उदय जोशी, अमित पंचभयै, ओमकार शौचे, प्रतीक शुक्ल यांच्यासह अन्य संस्थादेखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :cinemaसिनेमाmarathiमराठी