एसटी कामगारांचा एकजुटीने संप सुरूच; मनमाड आगारातील आणखी दहा कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:13 IST2021-11-30T16:12:21+5:302021-11-30T16:13:45+5:30
एसटीचा संप सुरू असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका ज्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही अशा गोरगरीब जनतेला बसत ...

एसटी कामगारांचा एकजुटीने संप सुरूच; मनमाड आगारातील आणखी दहा कर्मचारी निलंबित
एसटीचा संप सुरू असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका ज्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही अशा गोरगरीब जनतेला बसत आहे. खासगी वाहतूकदाराकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. येथील बसस्थानकावर येऊन परत जावे लावत आहे. मात्र, खासगी वाहनधारकांकडून मनमानी भाडेवाढीने सर्वसामान्य माणूस एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे उभा असल्याचे चित्र समोर येत आहे. राज्यात इतर ठिकाणी संप मागे घेण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त येत आहे. मनमाड शहरात मात्र एसटी कामगारांनी एकजुटीने संप सुरूच ठेवला आहे. याआधी येथील १० जणांचे निलंबन केले होते, तर पुन्हा १० जणांचे निलंबन करण्यात आले आहे. आतापर्यंत २३८ कर्मचाऱ्यांपैकी २० कर्मचारी निलंबन झाले आहे.
निलंबनाचे आदेश नाशिक विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाले असून मनमाड आगारातील मागे १० आणि आता १० अशा २० कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे. निलबंनाची टागंती तलवार कर्मचाऱ्यांवर आहे.
- प्रितम लाडवंजारी, आगार प्रमुख, मनमाड
आमचं निलंबन झाले आहे. आमचे सर्व कर्मचारी निलंबित झाले तरी चालेल. मात्र, जोपर्यंत आमचे शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत आम्ही संप सुरूच ठेवणार.
- अरुण सांगळे, कर्मचारी.