रेशनदुकानदारांचा संप अखेर मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:05 IST2020-06-09T22:40:56+5:302020-06-10T00:05:15+5:30
नाशिक : कोरोनासारखा महामारीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाने सुरू केलेल्या धान्यवाटप मोहिमेचा एक घटक असलेल्या रेशनदुकानारांना ५० लाखांचे विमाकवच देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने अखेर मागील आठवड्यात पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बुधवार (दि.१०) पासून अन्नधान्य वितरण सुरू होणार आहे.

मुंबईत एका रेशनदुकानदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आल्याने रेशनदुकानदारांनी विमा संरक्षणाची मागणी करीत संप पुकारला होता. त्यामुळे रेशनमधून वितरण होणारा धान्याचा पुरवठा थांबला होता. या संदर्भात रेशनदुकानदार संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
या संदर्भात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी संप करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगताना एखाद्या दुकानदाराचा कोरोनाची बाधा होवून मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच दिले जाईल. तसेच मोफत धान्य वाटपाचे कमीशनही दुकानदारांना अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. अजित पवार यांच्या सूचनेनुसार दुकानदारांनी संप मागे घेत असल्याची घोषणाही केली. या बैठकीस विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे सचिव गोपाल मोरे आदी उपस्थित होते.
-----------------------
रेशनदुकानदारांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. अन्य मागण्यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. रेशनदुकानदार कोरोनाच्या काळात सरकारच्या सोबत आहे.
- दिलीप तुपे, प्रदेश कार्याध्यक्ष, रेशनदुकानदार संघटना