पिंपळगावी लॉकडाऊनला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 13:41 IST2020-04-06T13:40:35+5:302020-04-06T13:41:15+5:30

पिंपळगाव बसवंत : कोरोना व्हायरसचा पादुर्भाव टाळण्यासाठी सगळ्या स्तरावरून प्रयत्न सुरू असताना पिंपळगावी संचारबंदीचे उल्लंघन करीत भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याने लॉकडाऊनला हरताळच फासला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे.

 Strike Lockdown to Pimpal | पिंपळगावी लॉकडाऊनला हरताळ

पिंपळगावी लॉकडाऊनला हरताळ

पिंपळगाव बसवंत : कोरोना व्हायरसचा पादुर्भाव टाळण्यासाठी सगळ्या स्तरावरून प्रयत्न सुरू असताना पिंपळगावी संचारबंदीचे उल्लंघन करीत भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याने लॉकडाऊनला हरताळच फासला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
सगळीकडेच संचारबंदी व लॉकडाऊन सुरू असल्याने पिंपळगाव येथील आठवडे बाजार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलेला होता. परंतु कोरोनामूळे संचारबंदी व लॉक डाऊनला नागरिक गांभीर्य न घेता हजारो च्या संख्येने रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या आदेशाला हरताळ फासत आहे. कोरोनाव्हायरसचा पादुर्भाव वाढत असल्याने त्याची खबरदारी म्हणून प्रत्येक ठिकाणी संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे. परंतु पिंपळगाव शहरात दररोज नेमून दिलेल्या ठिकाणी भाजीपाला भरत असून देखील रविवारच्या भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड झुंबड दिसून आली. अद्यापही नागरिक कोरोना विषाणूबाबत गांभीर्य घेत नसल्याने पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

Web Title:  Strike Lockdown to Pimpal

टॅग्स :Nashikनाशिक