मुलासह बापावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:17 IST2020-09-09T18:15:02+5:302020-09-09T18:17:21+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील देवीचा माथा येथील शिंदे कुटुंबातील मुलासह बापावर धारधार शस्राने हल्ला करत खून केला. या घटनेचा कसून तपास करून आरोपींना कठोर शासन करावे व पिंपळगाव बसवंत शहरात वाढत असलेली गुंडागिरी, अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालून शहराची शांतता व सुव्यवस्था टिकवावी, असे निवेदन पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

शहरातील शिंदे परिवारावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करा या मागणीचे निवेदन देताना भास्कर बनकर, नीलेश पाटील, सत्यजित मोरे, नितीन बनकर, धनंजय धामणे आदी.
पिंपळगाव बसवंत : परिसरातील देवीचा माथा येथील शिंदे कुटुंबातील मुलासह बापावर धारधार शस्राने हल्ला करत खून केला. या घटनेचा कसून तपास करून आरोपींना कठोर शासन करावे व पिंपळगाव बसवंत शहरात वाढत असलेली गुंडागिरी, अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालून शहराची शांतता व सुव्यवस्था टिकवावी, असे निवेदन पोलीस निरीक्षक संजय महाजन यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
पिंपळगाव शहरात गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगाराला कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळेच शहरात कर्तबगार व्यक्तींवर हल्ला झाला व त्यांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी त्या घटनेची कसून तपासणी करून दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर बनकर, सदस्य राजेश पाटील, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष नीलेश पाटील, किरण लभडे, नितीन बनकर, नीलेश मोरे, बाळासाहेब दुसाने, बाळासाहेब आंबेकर, सत्यजित मोरे, धनंजय धामणे, गिरीश मोगल, नीलेश दुसाने, कृष्णा महाले आदी उपस्थित होते.