शेतकºयांकडून पैसे घेणाºया केंद्रचालकांवर कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST2017-08-06T00:01:14+5:302017-08-06T00:09:43+5:30

शेतकºयांकडून पैसे घेणाºया केंद्रचालकांवर कडक कारवाई
पाटोदा : राज्य शासनाच्या वतीने शेतकरीवर्गासाठी कर्जमुक्तीबाबत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत महा-ई-सेवा संचालकांची बैठक तहसीलदार नरेशकुमार बहिरम, सहाय्यक निबंधक ए.पी. पाटील व जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी शरद पैठणकर यांच्या उपस्थित येवला येथील तहसीलदार कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी महा-ई-सेवा केंद्र संचालकांना या योजनेसाठी आवश्यक असलेले मंत्रा कंपनीचे डिवाईस उपलब्ध नसल्याने अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. ज्या शेतकºयाचा मोबाइल नंबर आधारशी जोडलेला आहे अशाच शेतकºयांचा वनटाइम ओटीपी पासवर्ड आल्यानंतर सर्व्हर डाऊन होत असल्याचे केंद्रचालकांनी उपस्थित अधिकारीवर्गाच्या निदर्शनात आणून दिले. यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी शरद पैठणकर यांनी अर्ज कसा भरावा, योजनेचा लाभ कुणाला मिळू शकतो, त्याच्या अटी व निकष याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महा-ई-सेवा, आपले सरकार केंद्राचे संचालक गणेश पाटील, गोरख घुसळे, लक्ष्मण घुगे, नामदेव पगार, संपत शेळके, विश्वंभर पाटील, दीपक उंडे, धीरेंद्र कडतन, दीपक आहेर, नवनाथ ठोंबरे, सोमनाथ घोलप आदींसह संचालक उपस्थित होते.