लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन न केल्यास व्यवसायिकांवर कडक निर्बंध लादणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:15 IST2020-06-12T21:13:32+5:302020-06-13T00:15:50+5:30
दिंडोरी : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र व्यवसाय करताना काळजी घेणे गरजेचे आहे तरी सर्वांनी शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे अन्यथा कडक निर्बंध लादावे लागतील, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिला आहे.

लॉकडाऊनच्या निर्देशांचे पालन न केल्यास व्यवसायिकांवर कडक निर्बंध लादणार
दिंडोरी : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र व्यवसाय करताना काळजी घेणे गरजेचे आहे तरी सर्वांनी शासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे अन्यथा कडक निर्बंध लादावे लागतील, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिला आहे.
दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात शहरातील व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते. प्रांत आहेर पुढे म्हणाले की, दिंडोरी शहरात कोरोनाचा रु ग्ण सापडलेला नाही. त्यामुळे शहरात धोका नाही. परंतु करोनाचा प्रादुर्भाव आजुबाजुच्या गावात एखाद्यास झाल्यास त्याचा त्रास शहरात होऊ शकतो.
नाशिक व मालेगाव हे दोन्ही हॉटस्पॉट दिंडोरीला राज्याच्या तुलनेने जवळ असून त्यामूळे आपण जास्त काळजी घ्यावी. भाजीपाला विक्र ेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आता दुकाने जरी दररोज सुरू ठेवायची असतील तर त्यासाठी प्रत्येक दुकानदाराने निर्जंतुकीकरण करु न घ्यावे. प्रत्येक ग्राहकाला शारीरिक अंतराचे पालन करण्यास सांगावे, सॅनिटायझरचा वापर करावा. हे नियम प्रत्येकाने कटाक्षाने पाळावे तरच दुकाने सुरु ठेवता येतील.
पानटपरी, सलून दुकाने, ब्युटीपार्लर बंदच ठेवावे लागणार आहे. मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनीही यावेळी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. यावेळी अविनाश जाधव, कैलास मवाळ, गटनेते प्रमोद देशमुख, रणजित देशमुख, सुनिल आव्हाड यांनी चर्चेत सहभाग घेतला. शहरातील बाजाराबाबत अविनाश जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी मुद्दा उपस्थित केला. प्रमोद देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे, काका देशमुख, सुमित चोरिडया, सुमती राठोड, सचिन आव्हाड, रवि जाधव, निलेश चव्हाण उपस्थित होते.