देवगाव येथे आठवडाभर कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 18:22 IST2021-04-19T18:22:17+5:302021-04-19T18:22:49+5:30
देवगाव : येथे सध्या कोरोनाची लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देवगाव येथे मंगळवार (दि.२०) पासून २७ एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली

देवगाव येथे आठवडाभर कडक निर्बंध
ठळक मुद्देनियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
देवगाव : येथे सध्या कोरोनाची लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देवगाव येथे मंगळवार (दि.२०) पासून २७ एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील. दवाखाने, मेडिकल या व्यतिरिक्त किराणा दुकाने, इतर दुकाने,भाजीपालाही बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व गावच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सरपंच, उपसरपंचांनी कळविले आहे.