शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 01:06 IST

दहा वर्षीय बालिकेला बिस्कीट घेण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रकाश चक्रपाणी चुडामणी (रा. पिंपळगाव बसवंत) यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपिंपळगावची घटना : निफाड न्यायालयाचा निकाल

लासलगाव : दहा वर्षीय बालिकेला बिस्कीट घेण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रकाश चक्रपाणी चुडामणी (रा. पिंपळगाव बसवंत) यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर २०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश चक्रपाणी चुडामणी हा रात्री ९ वाजता घरी येऊन दहा वर्षीय मुलीस बिस्किट घेऊन देतो, असे सांगून घेऊन गेला. बराच वेळ होऊनही तो मुलीला घेऊन परत आला नाही, म्हणून पती-पत्नी बघण्यास गेले असता लोक त्यास नग्नावस्थेत मारहाण करीत असल्याचे दिसले तर अल्पवयीन मुलगी रडत होती. त्यावेळी मुलीने वडिलांना प्रकाश चुडामणी याने केलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. यावरून प्रकाश चुडामणीविरु द्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६(२)(आय), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५ (एम), ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र रघुनाथ पाटील यांनी करून निफाड जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.सात साक्षीदारांची तपासणीसरकार पक्षातर्फेसहायक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. रमेश कापसे यांनी पीडित मुलीसह सात साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी कॉन्स्टेबल वेलजाळी यांनी सहकार्य केले. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश पी.डी. दिग्रसकर यांनी प्रकाश चंद्रमणी चुडामणी यास दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने सक्तमजुरी करावी लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय