विनामास्क फिरणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 01:21 IST2020-09-18T00:04:51+5:302020-09-18T01:21:56+5:30
नाशिक: लॉकडाऊनच्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्याच्या फलनिष्पत्तीचा विचार करूनच अनलॉक चा निर्णय घेण्यात आलाय परंतु लोकांनी अनलॉक म्हणजे कोरोना गेला आहे की काय अशा अविर्भावात बिनधास्त वावरणे सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन सर्वांना करायला हवे त्यासाठी शहर पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांनी कठोर उपाययोजना कराव्यात. केवळ दंड करणे हा शासन प्रशासनाचा हेतू नसून जनमानसात नियमांच्या अंमलबजावणीची भावना निर्माण करणे हा यामागचा हेतू असल्याची भूमिका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ज्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल त्यास प्रथम समज देण्यात यावी, त्यानंतरही त्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल तर ते दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात यावी. योग्य अंतराचे भाव राखून भाजीपाल्याचे विक्रीची खुल्या जागांवर व्यवस्था करता येत असेल तर ती निश्चितपणे करण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी पोलीस प्रशासनाची भुमिका अत्यंत महत्वाची असून येणाºया ४ दिवसात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही यावेळी भुजबळ यांनी दिल्या आहेत.
येणाºया काळात वाढत्या रुग्णसंख्येला पुरेल इतके बेड, व्हेंटीलेटर्स, आॅक्सिजन बेड, व्हेंटीलेटर्स बेड, मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर उभारता येईल यासाठीच्या जागा हेरून त्यासाठी पूर्वनियोजन करावे. टेली कौन्सिलींग तसेच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने शहरी तसेच ग्रामीण भागातही प्रभावी उपचार केले जाऊ शकतात तसे प्रयोग आपण यशस्वी केले आहेत. येणाºया काळात ते आणखी प्रभावीपणे राबविण्यात यावेत. प्रत्येक रुग्णालयातून ते खाजगी असो वा सरकारी तेथे २ अधिकाऱ्यांची नियुक्ता करून जनतेला त्यांचा मोबाईल संपर्क नंबर उपलब्ध द्यावा जेणेकरून लोकांना त्यांच्या माध्यमातून योग्य माहिती पोहचेल असे पहावे व त्यांच्यावर सनियंत्रणासाठी स्वतंत्र टीम असावी असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
पोलीसांच्या कोविड सेंटरचे आज उद्घाटन
शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून शहरात शहरी व शहरी व ग्रामीण पोलीसांसठी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली असून १०० बेडच्या या कोविड सेंटरचे शुक्रवारी (१८ सप्टेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. पोलीस व त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्यासाठी रूग्णवाहिका व कोविड उपचारांची सोय या कोविड सेंटरमघ्ये करण्यात येणार आहे.