साठेबाजी, भाववाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:05 IST2020-03-26T21:31:59+5:302020-03-26T23:05:01+5:30

नाशिक : जीवनावश्यक वस्तू विक्रे त्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना मालाची साठवणूक करणे, ...

Strict action against stocks, price hikes | साठेबाजी, भाववाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई

साठेबाजी, भाववाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत अडथळा अस्वीकारार्ह

नाशिक : जीवनावश्यक वस्तू विक्रे त्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असे करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाºयांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा व व्यवस्थितरीत्या मिळावा तसेच सर्वप्रकारचे दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार सुरळीत रहावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत माहिती आणि मदतीसाठी ‘टीम संकट सोबती’ तयार करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १७ अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक अधिकाºयाकडे वेगवेगळे विषय देण्यात आले असून, संबंधित अधिकाºयांचे संपर्क क्रमांक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दिले आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांना काही अडचणी येत असतील त्यांनी संबंधित अधिकाºयाला संपर्क केल्यास त्यांच्या अडचणींची सोडवणूक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किराणा दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये कामासाठी येणारा मजूर हा व्यवस्थित आपल्या कामावर जाईल, यासाठी शहर व ग्रामीण पोलीस प्रशासन यांनीदेखील हेल्पलाइन सुरू केली आहे. किराणा दुकाने व मेडिकलमध्ये काम करणाºया व्यक्तींची संख्या कमीत कमी ठेवणे बंधनकारक आहे. दरम्यान, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.




इन्फो-
जेवणाच्या थाळ्या देण्याचे नियोजन
प्रशासनाकडून जवळपास १० ते १५ हजार जेवणाच्या थाळ्या देण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक एकत्र येत आहेत. एकमेकांच्या सहकार्याशिवाय या संकटावर मात करणे शक्य नाही. त्यासाठी घराच्या बाहेर पडायचे नाही व सोशल डिस्टन्सीचा नियम पाळण्यात यावा. ज्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून आपण स्वत:ला व इतरांनाही दूर ठेवू शकू, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी व्यक्तकेला आहे.

Web Title: Strict action against stocks, price hikes