शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 9:42 PM

देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग त्यासाठी अपुरा पडू लागला आहे. त्यातच आरोग्य विभागाचे २७ कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

ठळक मुद्देदेवळा तालुक्यात रूग्ण संख्येत सातत्याने वाढ

देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग त्यासाठी अपुरा पडू लागला आहे. त्यातच आरोग्य विभागाचे २७ कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.आरोग्य विभागाला तालुक्यातील इतर शासकीय विभागांनी मदत करावी असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढला आहे. काही विभागांचा अपवाद वगळता इतर विभागांनी आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून कोणत्याही क्षणी आरोग्य विभाग व्हेंटीलेटरवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देवळा तालुक्यात दहा दिवस जनता कर्फ्यु पुकारूनही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली नाही. ह्या काळात १०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण दररोज सापडत होते. तालुक्याची कोरोनाचा विस्फोट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या व होम क्वारंटाइन केलेल्या अनेक व्यक्तीचा गावागावात मुक्त संचार सुरू असून स्प्रेडरची भुमिका बजावत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ह्या बेफिकीर नागरीकांना शिस्त लावण्यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा दिसून येत नाही, त्यातच अनेक गावांमध्ये कोरोनाप्रती स्थानिक प्रशासनाची दिसून आलेली निष्क्रियता देखील कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.उपविभागीय अधिकारी यांनी ५ एप्रिल रोजी तालुक्यातील इतर शासकीय विभागांनी आरोग्य विभागाला मदत करावी असा आदेश काढूनही अपवाद वगळता इतर विभागांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यापूर्वी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय विभागांची बैठक घेऊन त्यांना एकमेकांशी योग्य समन्वय साधत काम करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु अपेक्षित परीणाम दिसून आला नाही.आमदार आहेर यांनी यात लक्ष घालून कामचुकारपणा करणाऱ्या विभागांना समज द्यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.देवळा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून अनेक तरूण व घरातील कर्ते पुरूष कोरोनाला बळी पडले आहेत. अनेक गावात शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहेत. हे पूर्ण कुटुंब बाधित झाल्यानंतर त्यांना उपचार घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यामुळे शेतातील पाळीव जनावरांना चारा पाणी करण्यास देखील घरात कोणी नाही, यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. कोरोनाच्या भितीमुळे आजुबाजूचे शेतकरी देखील जनावरांना चारा पाणी करण्यास धजावत नसल्याचे चित्र काही गावात दिसून आले आहे.मास्कचा वापर, स्वच्छता, व सामाजिक अंतर हया त्रिसुत्रीचे पालन करावे, कोरोना रुग्णांनी १४ दिवस घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.तालुका-देवळादिनांक-११/४/२१ सायंकाळी-५ वाजता१ तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या - ३९५२२ शनिवारी आढळून आलेले नवीन रूग्ण - १२८३ नगरपरिषद क्षेत्र - १००७४ ग्रामपंचायत क्षेत्र - २९४५५ बरे झालेली एकुण रुग्णसंख्या - २९६२६ आज बरे झालेली रुग्णसंख्या - १५८७ एकुण मृत्यू - ३७८ आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या९ उपचारखालील रुग्ण - ९५३१० सीसीसी येथे दाखल - १७११ डीसीएचसीयेथे दाखल - २९१२ डीएचएस येथे दाखल - ०२१३ खाजगी रुग्णालयात दाखल - ४११४ गृह विलगिकरणात असलेले - ८६४ 

 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या