शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘लोकमत’ला लाभले सदिच्छांचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:08 IST

विश्वासार्हता व निर्भिडतेच्या बळावर वाचकांच्या मनावर लोकप्रियतेची अमिट छाप उमटविणाऱ्या ‘लोकमत’वर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत सदिच्छांचे बळ देत स्नेहभाव वृद्धिंगत केला

नाशिक : विश्वासार्हता व निर्भिडतेच्या बळावर वाचकांच्या मनावर लोकप्रियतेची अमिट छाप उमटविणाऱ्या ‘लोकमत’वर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत सदिच्छांचे बळ देत स्नेहभाव वृद्धिंगत केला. निमित्त होते... ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीच्या चोविसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे !अंबड येथील ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयातील हिरवळीवर शनिवारी सायंकाळी सुरेल बासरीवादनाच्या मंगल सुरावटीत हा दिमाखदार सोहळा उत्साहात पार पडला. ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी कैलास मठाचे आचार्य स्वामी संविदानंद सरस्वती, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास, लातूर येथील श्याम चैतन्य महाराज, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या पुष्पादीदी या धार्मिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवरां-बरोबरच नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी राज्यमंत्री डॉ.शोभा बच्छाव, माजी खासदार समीर भुजबळ, प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, जयंत जाधव, माजी महापौर अशोक मुर्तडक आदी राजकीय, तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, कुलगुरु ई.वायुनंदन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, वनसंरक्षक अनिल अंजनकर, महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, मुंबई येथील सहनिबंधक (एसआरए) बाजीराव शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उपायुक्त रोहिदास बहिरम, कामगार उपआयुक्त गुलाबराव दाभाडे, सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, राज्य पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहाणे, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने आदींसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.मतदार जागृतीसाठी पुढाकारदहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या हिरवळीवर ‘सेल्फी वॉल’द्वारे मतदान जागृती करण्यात आली. ‘मतदान हा आपला हक्क आहे’ व ‘लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा’, असा संदेश देणाºया या ‘वॉल’जवळ उभे राहून अनेकांनी मतदानाचे आवाहन केले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटNashikनाशिक