लोकसहभागातून पंचाळेत बसवले पथदीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST2021-05-09T04:15:07+5:302021-05-09T04:15:07+5:30
गत महिन्यात येथील पत्रकार प्रभाकर बेलोटे यांचा मुलगा प्रतीक याचा अपघाती मृत्यू झाला होता. असा प्रसंग पुन्हा घडू नये ...

लोकसहभागातून पंचाळेत बसवले पथदीप
गत महिन्यात येथील पत्रकार प्रभाकर बेलोटे यांचा मुलगा प्रतीक याचा अपघाती मृत्यू झाला होता. असा प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून रस्त्यावर पथदिवे लावण्याची आवश्यकता असल्याने ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांनी पुढाकार घेतला.
ग्रामपंचायत सदस्य उषा थोरात, रंजना थोरात, दुलाजी थोरात, भारत वाघ यांच्या मदतीने पदरखर्चाने पथदीप खरेदी केले. सदर पथदीप मुख्य चौक ते कानिफनाथ महाराज मंदिर या रस्त्याच्या बाजूला लावण्यात आल्याने रस्ता प्रकाशाने उजळला आहे. प्रतीक हा सामाजिक कार्यकर्ता असल्याने त्यास यानिमित्ताने ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
फोटो - ०८ पंचाळे लाइट
पंचाळे येथे बसविण्यात आलेले पथदीप.
===Photopath===
080521\08nsk_27_08052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०८ पंचाळे लाइट पंचाळे येथे बसविण्यात आलेले पथदीप.