महा लसीकरणला कॅन्टोन्मेंटमध्ये तुफान गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:04+5:302021-09-06T04:19:04+5:30
छावनी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ हजार लोकांचे लसीकरण झाले असून त्यात कोविशिल्ड व ...

महा लसीकरणला कॅन्टोन्मेंटमध्ये तुफान गर्दी
छावनी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ हजार लोकांचे लसीकरण झाले असून त्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. जेव्हा जिल्हा आरोग्य विभागाकडून लस उपलब्ध झाली तेव्हा दररोज ३०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र शनिवारी (दि. ४) महालसीकरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता सकाळपासूनच लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. डॉ. मनीषा होणराव, डॉ. शाहू पाटील, डॉ. नरेश दौलतानी याशिवाय सुरेखा माऴोदे ,मीना गवळे,आरती मटकर,सुमित कांडेकर, विनोद शुक्ला, दिनेश काबळेकर,सुशांत जगताप, नीलेश इंगळे, सोनाली गोडसे, पीयूष पाटील, सुनील पावशे, योगेश वाघमारे आदींनी दिवसभरात नागरिकांना कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस दिला. नागरिकांची गर्दी पाहता, सामाजिक कार्यकर्ते माया गिडवाणी यांनी त्यांच्यासाठी पाणी व चहाची व्यवस्था केली होती.