कांदा चाळींची साठवणूक क्षमता संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:23 IST2020-01-27T23:45:29+5:302020-01-28T00:23:18+5:30
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कांदा चाळींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे व त्यासाठी अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

कांदा चाळींची साठवणूक क्षमता संपुष्टात
नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कांदा चाळींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे व त्यासाठी अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात सोमवारी बनकर यांनी भुसे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात देशात अग्रस्थानी असून, कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्णात घेतले जाते.
देशात सर्वसाधारणपणे ७.६० लाख हेक्टरवर कांदा पीक घेतले जाते. त्यापैकी जवळजवळ ३५ टक्के म्हणजे २.६६ लक्ष हेक्टरवर कांदा पिकाची लागवड ही फक्त नाशिक जिल्ह्यात केली जाते. त्यामधून सर्वसाधारण ६९ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते. त्यापैकी उन्हाळी लागवड केलेल्या कांद्याची फक्त साठवणूक केली जाते. साधारणपणे ५४ लाख मेट्रिक टन उन्हाळी कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्णात होते. जिल्ह्यात विविध योजनांमधून उभारलेल्या व खासगी कांदा चाळींची संख्या जवळपास ५६३८६ इतकी आहे. त्यांची साठवण क्षमता साधारणपणे ११.७३ लाख मेट्रिक टन इतकी आहे.
जिल्ह्यात उत्पादन होणाºया उर्वरित ४२.२७ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादनाचे साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारणी लक्षांक वाढवून देण्यात यावे आणि त्याकरिता लागणारे वाढीव अनुदान देण्यात यावे जेणेकरून त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना होईल, असे बनकर यांनी म्हटले आहे.