पालखेडच्या पाण्यासाठी रास्ता रोको
By Admin | Updated: May 6, 2017 23:32 IST2017-05-06T23:32:11+5:302017-05-06T23:32:56+5:30
अंदरसूल येथे शासनाच्या निषेधाच्या घोषणांसह हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे याचा शंखनाद करून सुमारे तीन तास रास्ता रोको केला.

पालखेडच्या पाण्यासाठी रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : ३६ वर्षांपासून प्रासंगिक आरक्षणातून मिळणारे पाणी चुकीच्या धोरणामुळे यंदा रद्द केल्याने येवला तालुक्यातील शिवसेना व अंदरसूल, बोकटे, देवाळणे, दुगलगावसह सोळा गावांच्या ग्रामस्थांनी पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनासाठी आज, शनिवारी (दि. ६) सकाळी १० वाजेच्या सुमारास अंदरसूल येथे शासनाच्या निषेधाच्या घोषणांसह हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे याचा शंखनाद करून सुमारे तीन तास रास्ता रोको केला. यामुळे नाशिक - औरंगाबाद महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यानंतर मुंबई कायदा कलम ६८ व ६९ अनुसार कारवाई करून सोडून दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, उपतालुकाप्रमुख अमोल सोनवणे, शिवसेना नेते मकरंद सोनवणे, छगन आहेर, अरुण काळे, किसन धनगे, हरिभाऊ जगताप, अनंता आहेर, रावसाहेब देशमुख, पंकज सुरासे, उपजिल्हाप्रमुख वाल्मीक गोरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधकिसन सोनवणे व ज्येष्ठ नेते यादवराव देशमुख, भागीनाथ थोरात, मारुती वाकचौरे, पंडित मेहकर, आदींसह सुमारे ४०० शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.