धनगर समाजाचा रास्ता रोको

By Admin | Updated: August 3, 2014 00:42 IST2014-08-02T22:44:17+5:302014-08-03T00:42:22+5:30

प्रश्न आरक्षणाचा : डफ मोर्चाने दणाणले शहर; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Stop the way of Dhanajar community | धनगर समाजाचा रास्ता रोको

धनगर समाजाचा रास्ता रोको


नाशिक : डफांचा कडकडाट, सोबत टिपेला पोहोचलेला झांजेचा आवाज, धनगरी नृत्य, भंडाऱ्याची उधळण आणि यळकोट यळकोट, जय मल्हार अशा वातावरणात धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजित डफ मोर्चाने नाशिक दणाणले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून या मोर्चास प्रारंभ झाला़ त्र्यंबक नाका, जिल्हा परिषदमार्गे, शालिमार चौक, रेडक्रॉस चौक, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला़ मोर्चेकऱ्यांनी सुमारे सव्वादोन तास रस्त्यावरच ठाण मांडल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले़
ब्रिटिशांनी धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला होता़ राज्यघटनेतही याच जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश आहे़ राज्य शासनाने इतर आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली आहे़ धनगर व धनगड हे एकच आहे़ परंतु शब्दांमध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचे आरोप करत या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़
मोर्चात जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीचे भाऊलाल तांबडे, अ‍ॅड़ गंगाधर बिडगर, राजेंद्र खेमनार, शिवाजी ढेपले, साईनाथ गिडगे, बापू शिंदे, खंडेराव पाटील, धनंजय बुचडे, मच्छिंद्र बिडगर, पप्पू माने, मधुकर नंदाळे, आदिंसह धनगर बांधव सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Stop the way of Dhanajar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.