चांदवड-देवळा रस्त्यावर खेलदरी फाटा येथे रास्ता रोको
By Admin | Updated: September 2, 2015 23:09 IST2015-09-02T23:08:36+5:302015-09-02T23:09:21+5:30
चांदवड-देवळा रस्त्यावर खेलदरी फाटा येथे रास्ता रोको

चांदवड-देवळा रस्त्यावर खेलदरी फाटा येथे रास्ता रोको
चांदवड : अखिल भारतीय किसान सभा (मार्क्सवादी), जनहितवादी महिला संघटना यांच्या वतीने बुधवारी (दि. २) चांदवड तालुक्यातील खेलदरी फाटा येथे सुमारे सव्वा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे देवळा बाजूकडून व नाशिककडून येणाऱ्या वाहनांच्या सुमारे दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यामुळे खेलदरी फाट्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तहसीलदार, वन अधिकाऱ्यांंनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
आंदोलनाचे नेतृत्व हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, जयराम पवार, बाबाजी बर्डे, सुकदेव केदारे, रूपचंद ठाकरे, ताईबाई पवार, शिवाजी माळी, शिवाजी सोनवणे, ताई नवरे, राजाराम ठाकरे, शिवाजी गोधडे, नंदाबाई मोरे, जिजाबाई उशीर, भिला पवार, भास्करराव शिंदे, किरण डावखर, अनिल देशमाने, सुनीता शर्मा, दादा गांगुर्डे, तुकाराम बागुल, दौलत वटाणे यांनी केले.
यावेळी मनमाड विभागाचे उपअधीक्षक राहुल खाडे, चांदवडचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, वडनेरभैरवचे चंदन इमले व पोलीस दंगा पथक व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले. (वार्ताहर)