शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

लोहोणेरला सर्वपक्षिय रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 4:39 PM

लोहोणेर : - शेती मालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावा , दुधाला किमान ५० रु पये प्रति लिटर भाव मिळावा , व स्वामिनाथन आयोग स्वीकारावा तसेच किसान सभेच्या वतीने गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा म्हणून आज लोहोणेर येथे शिर्डी - साक्र ी महामार्गावर गिरणा नदी पुलाजवळ सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

लोहोणेर : - शेती मालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावा , दुधाला किमान ५० रु पये प्रति लिटर भाव मिळावा , व स्वामिनाथन आयोग स्वीकारावा तसेच किसान सभेच्या वतीने गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा म्हणून आज लोहोणेर येथे शिर्डी - साक् ी महामार्गावर गिरणा नदी पुलाजवळ सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात प्रहार संघटना, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना आदी सह लोहोणेर, विठेवाडी, सावकी, भउर, वासोळं, ठेंगोडा, आदी परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष पंडितराव निकम म्हणाले की, युती शासन हे शेतकरी विरोधी शासन असून त्यांना शेतकऱ्यांऐवजी उद्योगपतीचे हित महत्वाचे आहे. शेती मालास मातीमोल भाव मिळत असल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या केल्या जात आहे ही दुर्दैवी बाब आहे.आंदोलन काळात शेती मालाचे नुकसान न करता तो गरीब जनतेला वाटून द्या असे आवाहन करीत सत्ताधारी सरकारच्या मंत्र्यांना व लोकप्रतिनिधीना शेतकर्यांनी रस्त्यावर फिरकू दिले नाही पाहिजे असे सांगितले तर यावेळी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख लालचद सोनवणे म्हणाले की, महागाईला या सरकारच्या काळात लगाम घालता आला नाही जो पर्यंत शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवले जाईल. यावेळी झालेल्या आंदोलनात प्रहार संघटनेचे सुरेश जाधव, संजय देवरे, तुषार खैरनार, दर्शन आहेर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, शेतकरी संघटनेचे फुला जाधव ,कारभारी पगार, डॉ . चंद्रकांत पाटील, अशोक अलई, अनिल आहेर, धनाजी निकम, बापू जाधव, रावसाहेब निकम,बापू सावळे, नंदलाल निकम, महेंद्र आहेर, उध्दव निकम , मोठाभाऊ निकम, भाऊसाहेब आहिरे, मनोहर महाजन, मनोज देशमुख, तानाजी निकम,शशिकांत निकम, दिगंबर निकम, पोपट बागुल संजय निकम, केवळ सोनवणे आदीसह लोहोणेर, ठेंगोडा , विठेवाडी, भउर , वासोळं ,खालप, सावकी ,खामखेडा परिसरातील शेतकरी संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन कर्त्याच्यावतीने नायब तहसीलदार अनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले .

टॅग्स :Nashikनाशिक