विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:40 IST2020-09-06T14:40:09+5:302020-09-06T14:40:33+5:30
सिन्नर : नाशिक जिल्हा टी. डी. एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा केली. विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा
सिन्नर : नाशिक जिल्हा टी. डी. एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा केली. विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबविण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
एक वर्षापूर्वी सदरच्या शाळा मंत्रालय स्तरावर घोषित होणे अपेक्षीत असताना वित्त विभाग त्रुटी पुर्ततेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे फाईल पाठवत असल्याने शिक्षक बांधव पुरते हादरून गेले आहेत. शासनाने अनेक तपासण्या, माहिती वेळोवेळी मागून केवळ टाईमपास चालवला आहे. आता येथूून पुढे शाळा घोषित झाल्याशिवाय माहिती दिली जाणार नाही अशी भूमिका पदाधिकाºयांनी मांडली.
शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांनी एकही शाळा अनुदानापासून वंचित राहणार नाही असे आश्वत करु न त्रुटी पूर्ण करून व्ही. सी. मध्ये हा विषय प्रभावीपणे मांडरार असल्याचे सांगितले.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भरत भामरे, जिल्हा टीडीएफचे कार्यवाह एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष मोहन चकोर, बाळासाहेब ढोबळे, कांतीलाल नेरे, गोरख कुलधर, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, जर्नादन गायकवाड, दत्तात्रय विंचू, राजेंद्र महात्मे, सुभाष पवार, महाले आदींसह विनाअनुदानित शिक्षक बांधव-भगिनी उपस्थित होते. (फोटो ०६ सिन्नर १)