त्र्यंबक शहर, परिसरातील हाॅटेल्सची बदनामी थांबवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:19 IST2021-08-24T04:19:27+5:302021-08-24T04:19:27+5:30
त्र्यंबक पोलीस ठाण्यात आलेल्या हाॅटेल व लाॅजिंग व्यावसायिकांसमोर बोलताना समाधान बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, नोकऱ्या नाहीत ...

त्र्यंबक शहर, परिसरातील हाॅटेल्सची बदनामी थांबवा !
त्र्यंबक पोलीस ठाण्यात आलेल्या हाॅटेल व लाॅजिंग व्यावसायिकांसमोर बोलताना समाधान बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, नोकऱ्या नाहीत म्हणून आम्ही हाॅटेल व्यवसाय सुरू केला; परंतु दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय ठप्प झाले होते. आता निर्बंध शिथिल केले असले तरी एखाद्या घटनेचा विपर्यास केला जात आहे. पर्यटकांकडून दारू पिऊन धिंगाणा आदी वृत्तांमुळे भाविक, पर्यटक यांचे पर्यटनासाठी येणे बंद झाले आहे. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राची व पर्यटनस्थळांची विनाकारण बदनामी करणे चुकीचे आहे. एखाद्या हाॅटेलमध्ये बेकायदेशीर प्रकार तसेच जुगार रौलेट आदी गैरप्रकार चालत असतील तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करतीलच; परंतु इतर व्यावसायिकांची बदनामी करणे थांबवावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनची प्रत तहसीलदारांनाही देण्यात आली आहे.