पत्नीविरोधात तक्रार करणाऱ्या जावयास चोप
By Admin | Updated: June 11, 2017 00:19 IST2017-06-11T00:18:57+5:302017-06-11T00:19:08+5:30
नाशिक : पोलिसांत पत्नीच्या विरोधात तक्रार केल्याचा राग येऊन सासऱ्याने जावयास शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना सावरकरनगरमध्ये घडली़

पत्नीविरोधात तक्रार करणाऱ्या जावयास चोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पोलिसांत पत्नीच्या विरोधात तक्रार केल्याचा राग येऊन सासऱ्याने जावयास शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर रोडवरील सावरकरनगरमध्ये घडली़
पंचवटी कारंजावरील कृष्णाजी टॉवरमधील रहिवासी शक्ती मधुकर टर्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी पत्नीच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता़ याचा राग येऊन त्यांचे सासरे त्र्यंबक अंबुजी शेळके (रा़ पंचवटी) यांनी त्यांना रविवारी (दि़ ४) सकाळी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली़ यामध्ये टर्ले हे जखमी झाले असून, त्यांनी सासऱ्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे़