चीट फं ड कंपन्यांना केंद्रानेच रोखावे

By Admin | Updated: August 13, 2014 00:38 IST2014-08-12T23:13:13+5:302014-08-13T00:38:37+5:30

सतेज पाटील यांचा सोमय्यांना टोला

Stop cheating companies from the center | चीट फं ड कंपन्यांना केंद्रानेच रोखावे

चीट फं ड कंपन्यांना केंद्रानेच रोखावे

नाशिक : चीट फंड कंपन्यांवर राज्य शासन कारवाई करत नसल्याचा डांगोरा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या पिटत आहेत़ परंतु आरबीआय व सीबी यांच्याकडूनच चीट फं ड कंपन्यांना मान्यता दिली जात आहे़ त्यामुळे ओरड करण्यापेक्षा या कंपन्यांची मान्यता रोखण्यासाठी सोमय्यांनी केंद्राकडे प्रयत्न करावेत, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लगावला़
महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११० व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़
कुंभमेळ्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, कुंभमेळ्यातील सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे आमच्यावर असल्याने याची जोरदार तयारी करण्यात येत आहे़ राज्यातील पोलीस अधिकारी उत्तर प्रदेशात कुंभमेळ्याचा अभ्यास करून आले आहेत़ तसेच लवकरच गृह विभाग सर्व शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे धोरण स्वीकारत आहे़ मुंबई-पुण्यासह औरंगाबाद, तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत़ दहीहंडीबाबत न्यायालयाने दिलेले आदेश अंतिम असून, पोलीस या आदेशाची योग्यरीत्या अंमलबजावणी करणार आहेत़ यामुळे पथकांनी व आयोजकांनी सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले़

Web Title: Stop cheating companies from the center