स्वस्त धान्य दुकानदारांचा उद्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:19 IST2018-01-14T01:18:49+5:302018-01-14T01:19:23+5:30

नाशिक : वाशीम जिल्ह्यात आधारकार्ड क्रमांक रेशन दुकानांशी लिंक करण्यावरून झालेल्या वादातून शिधापत्रिकाधारकाने रेशन दुकानदाराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रेशन दुकानदार संघटनेने घेतला आहे.

Stop cheaper shoppers tomorrow | स्वस्त धान्य दुकानदारांचा उद्या बंद

स्वस्त धान्य दुकानदारांचा उद्या बंद

ठळक मुद्दे रेशन दुकानदाराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ रेशन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

नाशिक : वाशीम जिल्ह्यात आधारकार्ड क्रमांक रेशन दुकानांशी लिंक करण्यावरून झालेल्या वादातून शिधापत्रिकाधारकाने रेशन दुकानदाराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रेशन दुकानदार संघटनेने घेतला आहे.
पुरवठा खात्याकडून रेशन दुकानदारांना सक्ती केली जात असल्याने दुकानदार शिधापत्रिकाधारकांना आधारची सक्ती करीत आहेत. परंतु दुकानदारांनाच मारहाण करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवृत्ती कापसे, महेश सदावर्ते, दिलीप तुपे, गणपत डोळसे पाटील, सलीम पटेल आदींनी दिली आहे.

Web Title: Stop cheaper shoppers tomorrow