बोरगावला रास्ता रोकों
By Admin | Updated: March 16, 2016 08:27 IST2016-03-16T08:27:36+5:302016-03-16T08:27:36+5:30
बोरगावला रास्ता रोकों

बोरगावला रास्ता रोकों
सुरगाणा : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ बोरगाव येथे वणी - सापुतारा महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.
ईडीने केलेली अटकेची कारवाई सूडबुद्धीची असल्याचा आरोप सरकार व भाजपावर राष्ट्रवादीकडून यावेळी करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. आंदोलन स्थळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष जनार्दन भोये, श्रमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ गांगुर्डे, उपाध्यक्ष अशोक पवार, युवा तालुकाध्यक्ष राजू पवार, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष शांताराम गवळी, मंगेश जाधव, काळू बागुल, खंडू भोये, रघुनाथ भोये आदि पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक लीलाधर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले.(वार्ताहर)