कळवणला सर्वपक्षीय रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:20 IST2017-09-17T00:20:21+5:302017-09-17T00:20:58+5:30
शेतकºयांना वेठीस न धरता शासन व व्यापारी यांनी त्यांचा वाद परस्पर मिटवून कळवणसह संपूर्ण जिल्ह्यातील कांदा लिलाव सोमवारपासून सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी शनिवारी (दि. १६) कळवण येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनप्रसंगी दिला.

कळवणला सर्वपक्षीय रास्ता रोको
कळवण : शेतकºयांना वेठीस न धरता शासन व व्यापारी यांनी त्यांचा वाद परस्पर मिटवून कळवणसह संपूर्ण जिल्ह्यातील कांदा लिलाव सोमवारपासून सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी शनिवारी (दि. १६) कळवण येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनप्रसंगी दिला.
नफेखोरीसाठी साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाºया जिल्ह्यातील व्यापाºयांविरोधी आयकर व प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईविरोधात व्यापाºयांनी बेमुदत कांदा लिलाव बंद केले आहेत. याचा फटका शेतकºयांना बसला आहे. याविरोधात आज कळवण तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी व सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण बसस्थानकाजवळ सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दीड तास चाललेल्या आंदोलनप्रसंगी बोलताना पवार म्हणाले की, बाजार समितीतील अचानक बेमुदत लिलाव बंद झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी कांदा निघाल्यापासून कांद्याचे भाव गडगडले आहेत. आता कुठे हजाराच्यावर विकला जात होता. तोच शासनाने व्यापाºयांवर कारवाई केल्याने पुन्हा लिलाव बंदचे हत्यार व्यापाºयांनी उपसून शेतकºयांच्या मुळावरच वार केला आहे. कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. शासनाने व्यापाºयांना विश्वासात घेऊन तत्काळ सोमवारपासून बाजार समितीतील लिलाव सुरू करावे अन्यथा शेतकरी संघटना सोमवारी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.