चारही गाड्यांना मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:35 IST2020-09-19T19:37:58+5:302020-09-20T00:35:04+5:30
मनमाड : रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चार क्लोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात असून या चारही गाड्यांना मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्या संपूर्ण आरक्षित राहणार असून त्यांचा आरक्षणाचा कालावधी दहा दिवसांच्या राहणार आहे.

चारही गाड्यांना मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा
मनमाड : रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चार क्लोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात असून या चारही गाड्यांना मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्या संपूर्ण आरक्षित राहणार असून त्यांचा आरक्षणाचा कालावधी दहा दिवसांच्या राहणार आहे.
गाडी क्र मांक ०७३७९ डाउन वास्को दी गामा ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी ही दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासून पुढील दर शुक्र वारी प्रस्थान स्टेशनहुन १२.३० वाजता रवाना होइल, आणि तिसऱ्या दिवशी ०४.२० वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचेल. गाडी क्र मांक ०७३८० अप हजरत निजामुद्दीन ते वास्को दी गामा क्लोन विशेष गाडी ही दिनांक २७ सप्टेंबर २०२० पासून दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन १३.०० वाजता रवाना होइल आणि तिसºया दिवशी ०४.४५ वाजता वास्को दी गामा स्टेशनला पोहचेल.
गाडी क्र मांक ०६५२३ डाउन यशवंतपुर ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी ही दिनांक २३ सप्टेंबरपासून दर बुधवार व शनिवार रोजी प्रस्थान स्टेशनहुन १३.५५ वाजता रवाना होइल आणि तिसºया दिवशी १३.२० वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचेल.
गाडी क्र मांक ०६५२४ अप हजरत निजामुद्दीन - यशवंतपुर क्लोन विशेष गाडी ही दिनांक २६ सप्टेंबरपासून दर शनिवार व मंगळवार रोजी प्रस्थान स्टेशनहुन ०८.४५ वाजता रवाना होइल आणि तिसºया दिवशी ०६.२० वाजता यशवंतपुर स्थानकावर पोहचेल. या गाड्यांना मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने परिसरातील प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे सूत्रांकडून करण्यात आले आहे. (फोटो १९ मनमाड)