पोलीस भरतीमुळे आडगाव रस्ता बंद

By Admin | Updated: June 7, 2014 01:37 IST2014-06-07T00:53:59+5:302014-06-07T01:37:08+5:30

आडगाव पोलीस मुख्यालय ते नगरसेवक शिंदे यांच्या घराच्या जवळील रस्त्यावर घेण्यात येणार असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद.

Stop the Adgaon road due to police recruitment | पोलीस भरतीमुळे आडगाव रस्ता बंद

पोलीस भरतीमुळे आडगाव रस्ता बंद

नाशिक : ग्रामीण पोलीस दलातील भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे़ या प्रक्रियेतील उमेदवारांची धावण्याची चाचणी परीक्षा आडगाव पोलीस मुख्यालय ते नगरसेवक शिंदे यांच्या घराच्या जवळील रस्त्यावर घेण्यात येणार असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी दिली आहे़
भरतीप्रक्रिया २१ जूनपर्यंत चालणार असून, उमेदवारांची धावण्याची चाचणी परीक्षा रस्त्यावर घेण्यात येणार आहे़ यावेळी वाहनांचा अडथळा येऊ नये, तसेच अपघात होऊ नये यासाठी वॉर्ड क्रमांक ४ मधील आडगाव पोलीस मुख्यालय ते नगरसेवक अ‍ॅड़ शिंदे यांच्या घराजवळील तीन किलोमीटर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे़ प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे़ नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Stop the Adgaon road due to police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.