नाशिक : माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी सायंकाळी वडाळानाका परिसरात दगडफेकीची घटना घडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्तात वाढ करून परिस्थिती नियंत्रणात आणली.पूर्वीच्या वादावरून तिघा संशयितांनी महापालिकेचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.१७) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास वडाळानाका परिसरात घडली़ यामध्ये दलोड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ सुरेश दलोड व संशयित बापू उर्फ विक्रम तसंबड, पिंटू तसंबड व सोनू उर्फ संदीप साळवे यांच्यामध्ये जुना वाद आहे़
वडाळानाका परिसरात दगडफेकीने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:14 IST
माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर रविवारी सायंकाळी वडाळानाका परिसरात दगडफेकीची घटना घडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्तात वाढ करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
वडाळानाका परिसरात दगडफेकीने तणाव
ठळक मुद्देदलोड यांच्यावर हल्ला : बंदोबस्त तैनात